जिल्हा परिषद शाळा

विद्यामंदिर उपवडे

उपवडे गावामध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी असून लहान बालकांच्या शिक्षणाची सुरुवात येथेच होते. विद्या मंदिर उपवडे येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. तसेच विद्या मंदिर आर्डेवाडी, विद्या मंदिर न्हावाशिवाडी व विद्या मंदिर मारुतीचा धनगरवाडा या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी श्री स्वयंभू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बोलोली येथे नववी ते बारावी (कला शाखा) पर्यंत शिक्षण दिले जाते. या शैक्षणिक संस्थांमुळे उपवडे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.

  • विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध प्रयत्न केले जातात.
  • येथे शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते
  • पर्यावरण दिवस, स्वच्छता मोहिम.